पवारांवर आरोप करण्याचंं भाजपच घाणेरडं राजकारण - रोहित पवार

अधिकाऱ्यांच्या खोलीतील कॅमेऱ्याचे व्हिडिओ फक्त भाजपकडेच पहायाला मिळतात - रोहित पवार
Rohit Pawar Reaction on Devendra Fadnavis
Rohit Pawar Reaction on Devendra Fadnavisesakal
Summary

अधिकाऱ्यांच्या खोलीतील कॅमेऱ्याचे व्हिडिओ फक्त भाजपकडेच पहायाला मिळतात - रोहित पवार

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मत मांडत भाजपला (BJP) चिमटे काढले. केंद्र सरकारच्या सगळ्या एजन्सीज फडणवीसांसारखा विचार करणाऱ्या लोकांच्या हाती आहेत, सरकार गेल्यामुळे भाजप अस्वस्थ झालंय, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे (NCP) रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांवर आरोप करुन भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (Rohit Pawar Reaction on Devendra Fadnavis)

आज ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी फडणवीस यांनी केलेल्या आरोपला उत्तर दिले. यावेळी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काल पेन ड्राइव्ह दिला परंतु व्हिडिओपेक्षा ऑडिओ महत्वाचा असतो. तो त्यांनी सादर केला नाही. व्हिडिओ टूल नावाच्या अॅपचा वापर करत त्यांनी हा व्हिडिओ केला असावा. कारण भाजप कॉपीपेस्ट करण्यात पुढे आहे. 125 तास एखाद्याच्या कार्यालयात रेकॉर्डिंग कसे केले जाऊ शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपाने हे ठरवून केलं आहे. ऑडिओ मॅच करत हा व्हिडिओ तयार करण्यात आला असावा. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपास झाला की सत्य बाहेर येईलच, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Rohit Pawar Reaction on Devendra Fadnavis
125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे: शरद पवार

पुढे ते म्हणाले, विधानसभेत काल विरोधी पक्षातील नेत्यांचं भाषण प्रभावी होतं. त्यांनी पेनड्राइव्ह दिणं हे अपेक्षित होतं. मात्र त्याची चाचणी होण्यापूर्वीचं ते मिडियात आलं. त्यामुळे राजकारणासाठी याचा वापर झाला आहे. पॅगसेस प्रमाणेच (AI video toll) असेच एक अॅप आहे. यात ओठांचं लिपसिंग केलं जातं. त्याच्यातून तो व्यक्तीच बोलतो असे भासवलं जातं. या आरोपात याचा वापर झाला आहे असं मी म्हणणार नाही मात्र राजकारण करू नये, असे आवाहन करतो आहे. अधिकाऱ्यांच्या खोलीतील कॅमेऱ्याचे व्हिडिओ फक्त भाजपकडेच पहायाला मिळतात. यासंदर्भात वळसे पाटील सभेत बोलतील. मात्र या घाणेरड्या राजकारणाऐवजी सर्व सामान्यांचे प्रश्न विधानसभेत मांडायला हवेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar Reaction on Devendra Fadnavis
गिरीश महाजन प्रकरणात फडणवीसांनी कुभांड रचलंय; राऊतांचा हल्लोबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com