PM Narendra Modi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

RSS : पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज 100 वर्षापूर्वी पेरलं, ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे, हे आपण पाहतोय. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे.
Narendra Modi Speech in Nagpur
Narendra Modi Speech in Nagpur esakal
Updated on

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष आहे. एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे माधव नेत्रालय सेंटरच्या विस्ताराचा शिलान्यास करण्यात आला. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com