‘आरटीई’ची बुधवारी लॉटरी! ‘ही’ कागदपत्रे जवळ ठेवा; १,०१,९६९ मुलांना मिळणार नामांकित इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

‘आरटीई’अंतर्गत राज्यातील आठ हजार ८२८ तर सोलापूर जिल्ह्यातील २९५ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एक लाख एक हजार ९६९ विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ३२० विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.
rte news
rte newssakal

सोलापूर : सोलापूरसह राज्यभरातून ‘आरटीई’ प्रवेशासाठी तीन लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यांची छाननी प्रक्रिया आता संपली आहे. ‘एनआयसी’कडून प्रवेशाची लॉटरी काढण्याची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. बुधवारी (ता. ५) प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे.

‘आरटीई’अंतर्गत राज्यातील आठ हजार ८२८ तर सोलापूर जिल्ह्यातील २९५ खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एक लाख एक हजार ९६९ विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ३२० विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, अर्जांची छाननी आता संपली आहे.

आता दिव्यांग विद्यार्थी, विधवा, परितक्त्या महिलांच्या मुलांसाठी निश्चित केलेल्या टक्केवारीत जागा सोडल्या जातील. त्यानंतर शाळा ते विद्यार्थ्यांचे घर, यातील अंतर एक किलोमीटर, तसेच एक ते तीन किलोमीटर व तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या मुलांची यादी स्वतंत्र केली जाते. त्यानंतर ऑनलाइन लॉटरी काढली जाते.

आता केंद्र सरकारच्या ‘एनआयसी’कडून त्याची कार्यवाही सुरू आहे. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाली तर बुधवारी लॉटरी निघेल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. गोरगरिब कुटुंबातील मुलांना आरटीईचा मोठा आधार असून त्यातून त्यांना नामांकित शाळांमध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

बुधवारी (ता. ५) प्रवेशाची लॉटरी काढली जाणार

राज्यातील नामांकित खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही प्रवेश मिळावा म्हणून ‘आरटीई’ लागू करण्यात आला. त्याअंतर्गत यंदा राज्यातील एक लाख एक हजार ९६९ मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण घेता येईल. बुधवारी (ता. ५) प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे.

- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण, पुणे

पालकांनो, ‘ही’ कागदपत्रे जवळ ठेवा

  • - मुलाचा जन्म दाखला प्रवेशावेळी लागतो

  • - पालकांचा रहिवासी दाखला

  • - मागासवर्गीय मुलाचे जात प्रमाणपत्र

  • - प्रवेशावेळी लागेल मुलाचे आधारकार्ड

  • - दिव्यांग विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र

‘आरटीई’ची सोलापूरची स्थिती

  • एकूण शाळा

  • ८८२८

  • ‘आरटीई’तून प्रवेश

  • १,०१,९६९

  • एकूण अर्ज

  • ३,६६,५६२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com