'...आणि छत्रपती शिवरायांचा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा,' सेनेचा हल्लाबोल

Maharashtra Politics Sanjay raut on rebel mlas
Maharashtra Politics Sanjay raut on rebel mlase sakal

आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपमुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत? महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपमधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव भाजपचा असल्याचा दावा सेनेने सामना अग्रलेखात(Saamana Editorial) केला आहे. आणि हे असे राजकारण असल्याचा खुलासा भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केला असल्याचेही सामनात सांगण्यात आले आहे.(maharashtra politics)

काय म्हटले आहे अग्रलेखात?

महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, असं शिवसेनेपैकी (Shiv sena Rebel) कुणी बोललं तर यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होss, असं म्हणून बोभाटा करायचा, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

Maharashtra Politics Sanjay raut on rebel mlas
आसामहून 'बॉड्या' आणणार म्हणणाऱ्या राऊतांनी फिरवले शब्द; ट्वीट चर्चेत

सोमवारी सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना आमदारांच्या जीविताला धोका असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून याला उत्तर देण्यात आले.

यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे यांनाही टोला लगवाण्यात आला. एका बाजूला चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांना दोन दिवसात सरकार पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरुनही सामनातून टोला लगावण्यात आला.

भाजपची अलिकडच्या काळातली वक्तव्य गोंधळात टाकणारी आहेत. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगयचं, शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही. त्याचवेळी रावसाहेब दानेवांनी अंगाला हळद दावून आणि मुंडावळ्या बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक -दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल’ शिवसेनेच्या बंडाशी संबंध नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचं सरकार येईल, असं बोलायचं, त्यामुळे खरं काय? असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

Maharashtra Politics Sanjay raut on rebel mlas
बंडखोर झाले बिनखात्याचे मंत्री

शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

सात-आठ मंत्री आहेत, आमदार आहेत. आपली मंत्रालये, विभाग सोडून ते महाराष्ट्राबाहेर जाऊन बसले आहेत. कृषी, उच्च शिक्षण, पाणीपुरवठा, फलोत्पादन वगैरे खाती जनतेच्या जिव्हाळय़ाची आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलात बसले आहेत. जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन ते राज्याबाहेर गेले असते, पण शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेवून ते तत्त्वाची भाषा करीत आहेत.

Maharashtra Politics Sanjay raut on rebel mlas
शिवसेना आमदारांच्या बंडाचे नेमके 'हे' आहे कारण! भाजपच्या मदतीशिवाय आमदारकी अशक्य

आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत, पण काय हो मंडळी, महाराष्ट्रावर ‘फुटी’चे व ‘तुटी’चे संकट भाजपमुळे येऊ घातले आहे त्यावर गुवाहाटीमधील तुमचे दलबदलू प्रवक्ते अद्यापि तोंड का उचकटत नाहीत? महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपमधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांचे काय सांगणे आहे? अशा प्रखर शब्दात बंडखोरांना सवार करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com