ज्याचं त्याला कळंना अन् शेजाऱ्याला रात्री झोप येईना, सदाभाऊंचा राऊतांना टोला

राऊतांची भाषा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार, सदाभाऊंचा खोचक टोमणा
ज्याचं त्याला कळंना अन् शेजाऱ्याला रात्री झोप येईना, सदाभाऊंचा राऊतांना टोला
Summary

राऊतांची भाषा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार, सदाभाऊंचा खोचक टोमणा

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीसाठी विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह देशातील अनेक पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सदाभाऊंनी टोला हाणला आहे. राऊतांची भाषा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीकाही खोत यांनी केली आहे.

ज्याचं त्याला कळंना अन् शेजाऱ्याला रात्री झोप येईना, सदाभाऊंचा राऊतांना टोला
‘सोनिया गांधी व राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटेल’

सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. भाजपाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यावा या संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सदाभाऊ म्हणाले की, राऊतांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करावं अशी कोणती कल्पना अद्याप तरी दिलेली नाही. शरद पवारांनी मी उमेदवार नसल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे ज्याचं त्याला कळंना अन् शेजाऱ्याला रात्री झोप येईना, अशी परिस्थिती खासदार राऊत यांची झाली आहे. त्यामुळे राऊतांना रात्रभर जागण्याची गरज नाही, ज्याला जे हवं ते वेळी आली की त्यांचं काम करतील, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राऊतांची ही भाषा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आण्ण्याचा प्रकार असल्याचा घणाघणातही त्यांनी केला आहे.

सध्या राष्ट्रपती निवडणुकीवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. असं असताना आता सदाभाऊंनी या वादात उडी घेतल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता खासदार राऊत यावर कोणती प्रतिक्रिया देणार पहावे लागणार आहे.

ज्याचं त्याला कळंना अन् शेजाऱ्याला रात्री झोप येईना, सदाभाऊंचा राऊतांना टोला
राहुल गांधींची तिसऱ्या दिवशीही ईडी चौकशी; काँग्रेसचं दिल्लीत हिंसक आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com