288 आमदार आहेत, शक्य तेवढ्यांना फोन करणार; सदाभाऊ खोत लागले तयारीला

ज्यांच्याकडे चना आहे ते घोडेबाजार करतील मी शेतकरी आहे, मी कुठून घोडेबाजार करणार असं मत खोत यांनी व्यक्त केलं.
sadabhau khot
sadabhau khot esakal

मुंबई : विधानपरिषद निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीने सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दर्शवला आहे. भाजपाने पक्षाचे पाच उमेदवार जाहीर केले असून सदाभाऊ खोत हे अपक्ष म्हणून लढणार आहेत. त्यासाठी भाजपाने त्यांना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सदाभाऊ खोत आता तयारीला लागले आहेत.

(Sadabhau Khot On Maharashtra Legislative Assembly)

दरम्यान खोत यांनी माध्यमांना बोलताना भाजपने आपल्याला पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत. "२८८ आमदार शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून मला विधानपरिषदेवर पाठवतील. तसेच आमच्याकडे चना नाहीत तर आम्ही कुठून घोडेबाजार करायचा, ज्यांच्याकडे आहे ते करतील" असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

sadabhau khot
मुंबई ते अमरावती विशेष ट्रेन | लवकरच IRCTC च्या संकेतस्थळावर आरक्षण सुरू

"आमचं घर जळतंय आणि आम्ही कुठले चने आणायचे, इथे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करायला लागलाय, शेतकऱ्यांच्याबद्दल ज्यांच्या मनात आदर आहे ते मला निवडून देतील. सध्या महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत मी शक्य तेवढ्या आमदारांना फोन करणार, शक्य तेवढ्या आमदाराच्या भेटी घेणार आहे. मला खात्री आहे की ते मला निवडून देतील." असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी दाखवला आहे.

दरम्यान भाजपने विधानपरिषदेसाठी आपले पाच उमेदवार घोषित केले आहेत. आणि सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देण्याचंही भाजपने जाहीर केलं आहे. भाजपाच्या पाठिंब्यानंतर खोत यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. त्यानंतर आता सदाभाऊ खोत आता तयारीला लागले आहेत. "मी शक्य तेवढ्या आमदारांना फोन करणार आहे, पत्र पाठवणार आहे आणि त्यांच्या भेटीगाठीसुद्धा घेणार आहे." असं सदाभाऊ खोत बोलताना म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com