#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल 

ENVIS portal
ENVIS portal

पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 17 फेब्रुवारी 2016 रोजी ईएनव्हीआयएस (ENVIS) म्हणजेच Envoirnment Information System पोर्टलची सुरुवात केली. 

ईएनव्हीआयएस'(ENVIS) विषयी 

  • ईएनव्हीआयएस म्हणजेच पर्यावरण सूचना प्रणाली हा पर्यावरण मंत्रालयातर्फे 1982 साली सुरू केलेला कार्यक्रम आहे. 
  • या पोर्टलमार्फत सर्व पर्यावरण विषयक माहिती देशभरात या क्षेत्रात होत असलेले प्रयत्न व त्यापुढील समस्या अशा सगळ्या बाबींचे "डिजिटायझेशन' केले जाणार आहे. याने ही माहिती सर्वांना उपलब्ध होणे शक्‍य होणार आहे. 
  • हे पोर्टल देशभरात डिजिटल साक्षरता वाढवण्याच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत कार्यरत असणार आहे. 
  • या पर्यावरण सूचना प्रणालीचा सर्वाधिक वापर केंद्र सरकार, विद्यापीठे, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी यांच्याद्वारे केला जाईल. शिवाय सामान्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. 
  • पोर्टलचा पत्ता : httpp://envis.nic.in
  • 2014-15 साठीचा Best ENVIS Centre (Thematic)चा पुरस्कार Centre for Ecological Science आणि Indian Institute of Science यांना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला. 
  • बेस्ट स्टेट ENVIS सेंटरचा पुरस्कार सिक्कीममधील पर्यावरण व वन्यजीव विभाग (Envoirnment and Wildlife Management Department) यास देण्यात आला. 

ईएनव्हीआयएस' पोर्टलवर उपलब्ध बाबी 
या पोर्टलवर पर्यावरणासंबंधीची देशातील, जगभरातील केंद्रे - राज्य शासनाने प्रसारित केलेली माहिती उपलब्ध आहे. या पोर्टलवरील काही निवडक संदर्भ लेख व पुस्तकांची यादी 

  • State at a Glance : Jammu & Kashmir Vol (I)
  • Ecological Traditions of India-Gujrat-Vol IX
  • Envoirnment in the Indian Parliament 
  • Economic Legal Material
  • Important fungi and their applications
  • Important Bacteria and their applications
  • 2016- International year of pulses
  • Coverage of Swachh Bharat Abhiyan 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com