
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही आणि तशी कागदपत्रे उपलब्ध नाही. त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. आता यावर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. वाघ्या कुत्र्याची सत्य कथा काय ते त्यांनी सांगितलंय.