Sambhajiraje : संभाजेराजेंनी धुडकावली 'माविआ'ची ऑफर! सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केली भूमिका

Sambhajiraje Latest News : महाविकास आघाडीच्या ऑफरवरती संभाजीराजेंनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Sambhajiraje Latest News
Sambhajiraje Latest News

Sambhajiraje Latest News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान कोल्हापूर मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत अजून चर्चा सुरू आहेत. यादरम्यान संभाजीराजेंना मविआमधील तीन मुख्य घटकपक्षांपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता खुद्द संभाजीराजेंनी या ऑफरवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

संभाजीराजे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवेसना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट किंवा काँग्रेस या पक्षांपैकी एकात सामील होऊन लढले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली होती.

Sambhajiraje Latest News
GYAN in Budget 2024 : निर्मला सीतारमन यांच्या बजेटमध्ये दडलंय PM मोदींचं 'GYAN'; नेमकं काय आहे खास? वाचा

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी देण्यात येणार. या चर्चेदरम्यान संभाजीराजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली आहे. "स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे." असे संभाजीराजे म्हणाले आहेत.

Sambhajiraje Latest News
Paytm RBI Ban: वॉलेट, फास्ट टॅग्स पोर्ट होतील? आता UPI पेंमेंट करता येणार का? जाणून घ्या सर्व प्रश्नाची उत्तरं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com