Sangli Fire: आणखी एक आग; पेटलेल्या गाडीत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli fire news

Sangli Fire: पेटलेल्या गाडीत तरुणाचा मृत्यू, राज्यामध्ये दिवसभरात आगीच्या पाच घटना

सांगलीः शनिवारचा दिवस उगवला तोच नाशिक येथील आगीच्या घटनेने. या दुर्दैवी घटनेमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. आता आणखी एक आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. याही घटनेत एकाचा होरपळून मृत्यू झालाय.

सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील बलवडी येथे एका चारचाकी गाडीला अपघात झाला. अपघातानंतर गाडीने पेट घेतला. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मगबूल पटेल या २५ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू झाला.

हेही वाचा: Andheri By-Election: भाजपच्या फायद्यासाठी CM शिंदेंची खेळी!

दरम्यान, दिवसभरामध्ये पाच आगीच्या घटना घडल्या आहेत. नाशिक येथे पहाटे खाजगी बसला लागली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. दुसरी घटना मुंबईतल्या कुर्ला येथे घडली. येथेही एका इमारतीला आग लागली. तिसरी घटना नाशिकच्या मालेगाव येथे घडली. एका गॅस टँकरला आग लागली आणि चौथ्या घटनेत एका एसटी बसला आग लागली. ही घटनादेखील नाशिकच्या सप्तश्रृंगी परिसरात घडली आहे.

हेही वाचा: Bus Fire: बसला आग लागण्याची मुख्य कारणे काय? भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी महत्वाचे

सांगलीच्या पलूस शहरातील जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक हा अपघात झाला असून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी अपघात झाला आणि नंतर गाडीने पेट घेतला. यात गाडीसह चालक जळून खाक झाला. शनिवारी ही घटना घडली.