Sangli Loksabha Election 2024 : सांगलीतल्या पाटीलकीवर काँग्रेस ठाम! ठाकरे गटासोबत मैत्रीपूर्ण लढत? दिल्लीत खलबतं सुरु

Maharashtra Loksabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केल्यामुळे काँग्रेसने ठामपणे केलेल्या दाव्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये स्वतः शरद पवारांनी मध्यस्थी करुनही तोडगा निघून शकलेला नाही.

सांगलीमध्ये भलेही उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली असेल, परंतु काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे तेदेखील सांगलीत उमेदवार देणार असल्याचं बोललं जातंय. ठाकरे गटासोबत मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काँग्रेस उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सांगली लोकसभेचा तिढा सोडवण्यासाठी बधवारी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक संपन्न होत आहे. विश्वजित कदम आणि सांगली काँग्रेसचं एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालेलं आहे. सांगलीची जागा उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत. सांगलीचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील हेदेखील शिष्टमंडळामध्ये आहेत.

Sangli Loksabha Election 2024 : सांगलीतल्या पाटीलकीवर काँग्रेस ठाम! ठाकरे गटासोबत मैत्रीपूर्ण लढत? दिल्लीत खलबतं सुरु
Nagpur Crime: फोनवर मोठ्याने बोलण्यावरून झाला वाद, बापानेच डोक्यात रॉड घालून मुलाला संपवलं

सांगलीमध्ये भाजप, ठाकरे गट, काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातला निर्णय बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाकडून कुणकुण सुरु होती. त्यामुळेच ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्याचं बोललं जात आहे.

Sangli Loksabha Election 2024 : सांगलीतल्या पाटीलकीवर काँग्रेस ठाम! ठाकरे गटासोबत मैत्रीपूर्ण लढत? दिल्लीत खलबतं सुरु
UFO in India : तामिळनाडूमधील न्यूक्लिअर प्लांटजवळ फिरतायत उडत्या तबकड्या? पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

सांगली मतदारसंघाची सध्याची स्थिती

  • विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांचं लक्ष

  • ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभेच्या मैदानात

  • जयंत पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार

  • ‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरण्याची चिन्हे

  • भाजप, काँग्रेस भिडल्यास तुल्यबळ लढत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com