सांगलीत चर्चा तानाजी मालुसरे यांच्या आगळावेगळ्या विवाहाची

tanaji malusare sangli
tanaji malusare sangli

पुणे - सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथील तानाजी किसन मालुसरे आणि भारती चव्हाण यांनी आज जातीच्या बेड्या तोडत आंतरजातीय विवाह केला. देशभर तानाजी चित्रपट हाऊस फुल्ल सुरू असतानाच तानाजी यांचा आगळावेगळा विवाह हा योगायोग म्हणावा लागेल. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे तानाजी आणि भारती या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. विवाह इच्छापूर्ती संस्थेच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. या ओळखीनंतर दोघांनीही विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ग्रामीण भागात जातीव्यवस्था बळकट असतानाही या दोघांनी त्यावर मात करत एकमेकाचे जीवनसाथी होण्याचा संकल्प केला आणि तो पुरा केला.

तानाजी आणि भारती या दोघांनीही एकमेकांना आपल्या आठ वर्षाच्या मुलांसह स्विकारले आहे. सांगली जिल्ह्यातील या विवाहाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की तानाजी किसन मालुसरे रा. वसगडे (ता. पलूस) यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना सात वर्षाचा एक मुलगाही आहे. वाळवा तालुक्यातील भाटवडे येथील भारती बाळासाहेब चव्हाण यांचेही पती वारले आहेत. त्यांना आठ वर्षाचा मुलगा आहे. हे दोघे वेगवेगळ्या जातीतील आहेत मात्र या दोघांनी एकत्र येऊन विवाह करण्याचा निर्धार केला. इच्छापूर्ती विवाह संस्थेचे दत्तात्रय पाटील यांनी मध्यस्थी केली.

केजरीवाल अमित शहांना म्हणतात,' सर, मोफत चार्जिंगची सोयही केली आहे!

तानाजी आणि भारती यांच्या विवाह करण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या नातेवाईकांनीही त्याच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले.यावेळी दोघांनीही आपल्या मुलांना स्वीकारण्याचे ठरवले.त्यांच्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला.आज दोघांचाही विवाह औदुंबर येथे पार पडला.या विवाहाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com