Sanjana Jadhav : जनतेच्या मनातील आमदार मीच! दानवेंच्या लेकीचे विधानसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत

Sanjana Jadhav and Raosaheb Danve
Sanjana Jadhav and Raosaheb Danve

कन्नड : माझ्या घरात मंत्रिपद, आमदारकी सर्व काही असताना माझ्या वाट्याला संघर्ष आला. तो संघर्ष दुष्मनांच्याही वाट्याला येऊ नये. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातील विधानसभा सदस्य मीच आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य संजनाताई जाधव यांनी केले आहे. संजना जाधव या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.

Sanjana Jadhav and Raosaheb Danve
Success Story : दहा एकराला ४० गुंठे भारी! अवघ्या दीड महिन्यात शिमला मिरचीतून दोन लाखांचं उत्पन्न

कन्नड बाजार समिती निवडणुकीत संजना जाधव व माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बहुमताने विजय संपादित केला. या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा शनिवारी (ता.१३) पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी संजना जाधव पुढे म्हणाल्या की, कन्नड तालुक्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मतदारसंघांमध्ये अठरा वर्षांपासून मी विविध आघाड्यांवर संघर्ष करत आहे. हा संघर्ष दुष्मनांच्याही वाट्याला येऊ नये. माझ्या घरात सर्व सत्ता केंद्र असताना मी सुखाने घरात राहू शकते. मात्र, कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी मी संघर्ष करत आहे. कार्यकर्ते हेच माझे कुटुंब बनले आहे असे भावोद्गारही त्यांनी काढले.

Sanjana Jadhav and Raosaheb Danve
Mother's Day : ऐन तारुण्यात पतीचं निधन! दुसऱ्या लग्नाचा विचार टाळून ‘तिने’ मुलासाठी घेतले वाहून

प्रास्ताविक सिद्धेश्वर झाल्टे यांनी केले. याप्रसंगी साईनाथ अल्हाड, कैलास अकोलकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख केतन काजे, प्रताप चव्हाण,डॉ. मनोज राठोड, प्रताप चव्हाण, बाळासाहेब जाधव, किशोर पवार, गोकुळसिंग राजपूत आदींची भाषणे झाली. मंचावर नवनिर्वाचित संचालक अब्दुल जावेद, दिलीप बनकर, देविदास मनगटे, जयेश बोरसे, शिवाजी थोरात, चंद्रभान गोरे, किशोर पवार, गणेश साळुंखे, बाबूराव बनकर, कृष्णा हारदे, पंढरीनाथ निकम आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निकम तर आभार शेखनाथ चव्हाण यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com