esakal | संजय काकडे भेटले शरद पवारांना, सांगितले हे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar meets Sanjay Kakade

अजित पवार अद्यापही भाजपसोबत जाण्याच्या आपल्या मतावर ठाम आहेत. अजित पवारांनी आपला निरोप घेऊन काकडेंना शरद पवारांकडे पाठविले तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असे काहीच नसून संजय काकडे वैयक्तित कामासाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिल्याचे समोर आले आहे. 

संजय काकडे भेटले शरद पवारांना, सांगितले हे कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही पवारांमध्ये समेट घडवू आणण्याचा प्रयत्न करू शकतात असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, काकडे यांनी '' वैयक्तिक कामासाठी भेटलो होतो, कोणतीही राजकीय चर्चा केली नाही असे स्पष्ट केले. 

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत.

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार अद्यापही भाजपसोबत जाण्याच्या आपल्या मतावर ठाम आहेत. अजित पवारांनी आपला निरोप घेऊन काकडेंना शरद पवारांकडे पाठविले तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, असे काहीच नसून संजय काकडे वैयक्तीत कामासाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिल्याचे समोर आले आहे. 

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

दरम्यान, सिल्व्हर ओक या निवासस्थानी काकडे भेटून गेल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली होती. ''काकडे राष्ट्रवादीमध्ये येत आहेत असे सांगून काकडे भेटीवर पडदा टाकला मात्र, याबाबतही काकडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ''मी कुठेही जाणार नाही. राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, मी भाजपमध्येच आहे. आव्हाडांनी वेगळा अर्थ काढला. त्यांनी जी माहिती दिली ती खोटी असून त्यावर विश्वास ठेवू नका असे, काकडे यांनी सांगितले

अजित पवार राष्ट्रवादीकडे परत येणार ?