"संजय पांडे हे सरकारचे लाडके आहेत असे म्हणणे.."

संजय पांडेना राज्याच्या महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती
Sanjay Pandey
Sanjay Pandeyटिम ई सकाळ
Updated on

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) हे पोलीस महासंचालक या पदासाठी पात्र नसल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हटले होते. संजय पांडेना राज्याच्या महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दिपांकार दत्ता यांनी आज दोन्ही बाजू ऐकून घेतली.

संजय पांडे सरकारचे लाडके अधिकारी आहेत का ? न्यायालयाच्या या प्रश्नाला संजय पांडे यांचे वकिल अ‍ॅड सेरवाई युक्तीवाद करताना म्हणाले, “संजय पांडे राज्यातील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सुबोध जैस्वाल केंद्र सरकारच्या सेवेत गेल्यावर राज्यात संजय पांडे सगळ्यात सिनियर अधिकारी आहेत. संजय पांडे कोणत्याही सरकारचे लाडके अधिकारी नाही.सत्ता कोणाचीही असली तरीही संजय पांडे यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी १५ वर्षे न्यायिक संघर्ष करावा लागला. मी प्रक्रियात्मक त्रुटी नाकारत नाही परंतु संजय पांडे हे सरकारचे लाडके आहेत असे म्हणणे, या माणसाच्या रेकॉर्डला बाधा पोहोचवणारे आहे, अशा शब्दात अ‍ॅड सेरवाई यांनी संजय पांडेची बाजू मांडली.

Sanjay Pandey
मला कोणी अटक करू शकले नाही - नितेश राणे; पाहा व्हिडिओ

या प्रकरणाची पुढील सुनावनी २१ फेब्रुवारी रोजी असून याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police
jewellery theft
YCMOU nashik
Maharashtra Latest Marathi News Live Update
Marathi News Esakal
www.esakal.com