"दीड महिन्यात पोलीस आयुक्त संजय पांडे करणार शिवसेनेत प्रवेश"

किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला आहे.
किरीट सोमय्या
किरीट सोमय्या सकाळ
Updated on

आपल्या विरोधात बोगस एफआयआर दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांच्यावर केला होता. त्यावरूनच आता भाजपा आक्रमक झालं असून पक्षाचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. त्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी संजय पांडेंसंदर्भात आणखी एक मोठं विधान केलं आहे.

किरीट सोमय्या
दिल्लीवरून परतताच सोमय्या भाजपा नेत्यांसह राज्यपालांच्या भेटीला

संजय पांडे यांना येत्या दीड महिन्यात शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, असं विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या म्हणाले,"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांना येत्या दीड महिन्यामध्ये शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेत आहोत आणि गरज पडल्यास या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयातही जाऊ. "

किरीट सोमय्या यांच्यासोबत आज गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, मंगल प्रसाद लोढा, सुनील राणे हे भाजपा नेतेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police
jewellery theft
YCMOU nashik
Maharashtra Latest Marathi News Live Update
Marathi News Esakal
www.esakal.com