'आमच्यात थोडे मतभेद आहेत पण मनभेद नाही' : वसंत मोरे | Raj Thackeray News | Vasant More News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray News, Vasant More News

'आमच्यात थोडे मतभेद आहेत पण मनभेद नाही' : वसंत मोरे

पुणे : पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Vasant More) हे दोन दिवसानंतर पुण्यात परत आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर वसंत मोरे हे तिरुपती बालाजीला गेले होते. त्यानंतर ते पुण्यात आल्यावर माध्यमांशी बोलत होते.

(MNS Vasant More News)

"आमच्या प्रभागात हनुमान चालीसा पठण झाली नाही. मी जरी इथे नसलो तरी माझे मनसैनिक सज्ज होते असं म्हणत सध्या मी जरा शांत आहे आणि माझ्या कुटुंबाकडे आणि व्यवसायाकडे लक्ष देत आहे." असे ते माध्यमांना बोलताना म्हणाले.

हेही वाचा: OBC आरक्षणप्रकरणी भाजपा पुन्हा आक्रमक होणार? बैठकीत ठरणार रणनीती

"मी दरवर्षी बालाजीला जात असतो त्यामुळे मागच्या दीड महिन्यापूर्वी मी बुकिंग करुन ठेवलं होतं. ठाण्याच्या सभेला मी माझ्या घरचा कार्यक्रम रद्द करुन गेलो होतो पण मी पण एक माणूस आहे म्हणून मी माझ्या कुटुंबाला सध्या वेळ देत आहे. एखाद्या लढाईला सेनापती जरी नसला तरी आमचे मनसैनिक लढाईला तयार आहेत." असं ते बोलताना म्हणाले.

त्यांच्या स्टेटसबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, "मी राजमार्गावर आहे आणि राजमार्गावरंच राहणार आहे. तुम्ही माझ्या स्टेटसमधील खालचे दोन वाक्य वाचले पण सुरूवातीचे वाक्य तुम्ही घेतले नाही त्यामुळे तुम्हाला तसं वाटंत असेल. सध्या मी पक्षाचं १३ वर्ष काम करुन थकलो आहे, मी अस्वस्थ नसून मी शांत आहे." असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार कोसळला; निफ्टी-50 मधील सर्व शेअर्समध्ये घसरण

"आमच्या प्रभागात भोंग्याबाबतच्या नियमांचं पालन होत असून मी नेहमीच मनसेसोबत एकनिष्ठ आहे, काही मतभेद आहेत पण आमच्यात मनभेद नाहीत. पक्षांतर्गत कुरघोडी या पक्ष मोठा होत असताना होत असतात पण मी सध्या राजमार्गावरंच आहे." असं ते म्हणाले.

दरम्यान औरंगाबाद येथील जाहीर सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अटींचं पालन न केल्याप्रकरणी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना झाले होते. त्यामुळे माध्यमांत चर्चांना उधाण आलं होत त्यावर आता वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Web Title: Mns Vasant More On Raj Thackeray Balaji Return

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top