Eknath Shinde Shrikant Shinde : दिल्लीत एकनाथ शिंदेंची ताकद! संसद रत्न पुरस्कार जाहीर; श्रीकांत शिंदेंसह १२ खासदारांचा गौरव

Parliament Ratna Award : संसद रत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह १२ खासदारांचा गौरव करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीत एकनाथ शिंदे गटाची ताकद अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde Shrikant Shinde sansad ratna award

Eknath Shinde Shrikant Shinde sansad ratna award

esakal

Updated on

Sansad Ratna Award announced for 12 MPs : संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी यंदा बारा खासदार आणि चार संसदीय समित्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह हेमंत विष्णू सावरा, स्मिता उदय वाघ, नरेश गणपत म्हस्के आणि मेधा विश्राम कुलकर्णी यांची विविध श्रेणींमध्ये निवड झाल्याने राज्याच्या संसदीय प्रतिनिधित्वाला विशेष गौरव मिळाला आहे. ‘प्राइम पॉइंट फाउंडेशन’ या संस्थेने याबाबतची घोषणा केली असून संसदेतील सक्रिय सहभाग, धोरणात्मक चर्चा आणि जनहितासाठीच्या योगदानाच्या आधारे हा सन्मान दिला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com