गुजरातमध्ये करवीर छत्रपतींचा अविस्मरणीय ठेवा ; स्टॅच्यू ऑफ युनिटीत करारपत्र : Sambhaji Raje Chhatrapati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Raje

गुजरातमध्ये करवीर छत्रपतींचा अविस्मरणीय ठेवा ; स्टॅच्यू ऑफ युनिटीत करारपत्र

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे करवीर छत्रपतींचा व भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अविस्मरणीय ठेवा पाहून भारावल्याची पोस्ट खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त त्यांनी स्मारकास भेट दिली. करवीर राज्याच्या विलीनीकरणाचे करारपत्र सरदार पटेल यांच्या स्मारकामध्ये विशेषत्वाने प्रदर्शित केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे म्हणतात, देशातील साडे पाचशेहून अधिक संस्थानांचे विलीनीकरण होणे गरजेचे होते. कित्येक संस्थानिकांनी स्वखुषीने विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सरदार पटेल यांनी सर्व संस्थानिकांना विश्वास देण्यात मोलाची भूमिका बजावली. याची आठवण म्हणून स्मारकात देशातील काही मोजक्याच महत्त्वाच्या संस्थानांचे विलीनीकरणाचे करार प्रदर्शित करण्यात आले आहे. यात जम्मू काश्मीर, जयपूर, बिकानेर, अलवर यांसह कोल्हापूर राज्याच्या विलीनीकरणाचा करारही आहे. कोल्हापूर राज्याचे तत्कालीन अधिपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.

हेही वाचा: कोल्हापूरच्या 'वडापाव'वर अमोल कोल्हेंनी मारला ताव अन् झाले भावूक...

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी लोकशाहीचे निर्वहण करण्यासाठी सशक्त व सुशिक्षित झाली पाहिजे, याची काळजी घेतली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या राज्यकारभारात रयतेला निम्मे अधिकार बहाल करून कोल्हापूर राज्यात लोकशाहीचा पाया सशक्त केला. मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांनी कोल्हापूर तथा करवीर राज्य स्वतंत्र भारतात विलीन करून रयतेला संपूर्ण लोकशाही प्रदान करून, त्यावर कळस चढविला. विलीनीकरणाचे करारपत्र स्मारकात विशेषत्वाने प्रदर्शित केल्याने आनंद झाला. सहयोगी खासदारांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनीही याचे विशेष कौतुक करत अभिमान व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

loading image
go to top