सतेज पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी

Satej Patil Joins Cabinet Kolhapur Marathi News
Satej Patil Joins Cabinet Kolhapur Marathi News

कोल्हापूर - शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले आहे. पण या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कित्येक दिवस रखडला होता. आज त्याला मुहूर्त लागला. या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांनी शपथ घेतली आहे. काँँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांना या मान मिळाला आहे. काही दिवसापूर्वी यासाठी त्यांनी दिल्ली दाैराही केला. त्यांच्या मंत्रिमंडळातील निवडीने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 

मंत्री म्हणून शपथ घेतलेले आमदार सतेज पाटील यांनी २००४ ला करवीर मतदार संघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्विजय खानविलकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाटील यांनी २००९ ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. जिल्ह्यातील मतदार संघांची नव्याने रचना झाल्यानंतर काँग्रेसकडून त्यांनी कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला. 2009 च्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये ते गृहमंत्रीही झाले. 

पराभव होऊनही ते लढत राहीले...

२०१४ ला केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर निर्माण झालेल्या मोदी लाटेचा फटका त्यांना बसला. कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसच्या तिकीटावर लढताना त्यांचा पराभव झाला. पण ते खचले नाहीत. त्यांनी विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरु ठेवला. अखेर त्यात त्यांना यश आले. विधान परिषद निवडणूकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर  पाटील - महाडिक यांच्या संघर्ष वाढीस लागला.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पाटील यांनी पुतण्या ऋुतुराज पाटील याला दक्षिणमधुन उमेदवारी दिली. ऋुतुराज पाटील विजयी झाले. पाटील विरुद्ध महाडिक या लढाईत सतेज पाटील यांनी पहिल्यांदा महादेवराव महाडिक नंतर लोकसभेला धनंजय महाडिक विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव करत महत्त्वाची भूमिका बजावली.

काँग्रेसच्या निष्ठेचे फळ...

काँग्रेसमुक्त जिल्हा असताना त्यांच्यावर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आली. यात त्यांनी योग्य भुमिका बजावत जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार निवडूण आणले. कोल्हापूर उत्तरमधून चंद्रकांत जाधव, करवीरमधून पी. एन. पाटील, दक्षिणमधून ऋुतुराज आणि हातकमंगलेमधुून राजुबाबा आवळे हे काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक नेत्यांची भाजपची वाट धरली. मात्र पाटील काँग्रेसमध्ये कायम झाले. या निष्ठेचे फळ त्यांना आज मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com