Pradeep Kurulkar: 'प्रदीप कुरुलकरांना वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा हटवला का?' ठाकरे गटाचा अमित शहांवर गंभीर आरोप

Pradeep Kurulkar: ''मोदींनी काँग्रेसवर टीका करणं, ही राजकीय दिवाळखोरी''
Pradeep Kurulkar
Pradeep KurulkarSakal

Pradeep Kurulkar: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देशद्रोहाच्या कायद्याबाबत गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना वाचवण्यासाठी सरकार देशद्रोहाचा कायदा हटवत आहे का?

शनिवारी (१२ ऑगस्ट २०२३) राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'ब्रिटीशकाळातील देशद्रोहाचा कायदा रद्द केला. चांगली गोष्ट आहे. देशात कोणी देशद्रोही नाहीये. ज्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावायचा होता त्याविरोधात लावला नाही.

पुण्यात प्रदीप कुरुलकरने पाकिस्तानला येथून संरक्षण क्षेत्रातील गुपित पोहचवली, तो आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याच्या विरोधात तर देशद्रोहाचा कायदा वापरला नाही. त्याला वाचवण्यासाठी तर हा कायदा हटवला नाही ना?' असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अमित शहांवर केला आहे.

सामनातील अग्रलेखातून मोदींवर टिका

मोदींनी काँग्रेसवर टीका करणं, ही राजकीय दिवाळखोरी असल्याची टीका ठाकरे गटानं सामनातील अग्रलेखातून केली आहे. “मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत?

Pradeep Kurulkar
Nawab Malik : "नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे ते सुटले"; मलिकांना १६ महिन्यांनंतर जामीन, ठाकरे गटाच्या नेत्याचं खोचक वक्तव्य

मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच.

मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असताना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत. यात नेहरूंचा दोष काय?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

Pradeep Kurulkar
Marathi News Live Update: नाराजीनाट्यानंतर चांदणी चौकातील पुलाचं लोकार्पण सोहळ्याला मेधा कुलकर्णी उपस्थित

यावेळी त्यांनी राजस्थानच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गहलोत यांच्या लीडरशिपमध्ये काँग्रेसचे सरकार येणार आहे. तुम्ही कधीही निवडणुका घ्या. मी वातावरण पाहिलं आहे. तिथे काँग्रेसच निवडून येणार आहे.

तुम्ही कुणाचंही सरकार टिकू देत नाही. चालू देत नाही. ही कोणती लोकशाही आहे? पैशाच्या जोरावर आणि केंद्रीय एजन्सीच्या जोरावर सरकार तोडणे हा देखील एक प्रकारे देशद्रोहासारखा अपराध आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com