esakal | आज बाळासाहेब असते तर....; पवारांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar address MLA of Mahavikas Aghadi at Trident hotel

आज बाळासाहेब ठाकरे असते तर खूप आनंद झाला असता, एकमेकांवर खूप टीका केली, पण व्यक्तिगत सलोखा कधीच सोडला नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले.

आज बाळासाहेब असते तर....; पवारांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज बाळासाहेब ठाकरे असते तर खूप आनंद झाला असता, एकमेकांवर खूप टीका केली, पण व्यक्तिगत सलोखा कधीच सोडला नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करताना व्यक्त केले आहे. ते मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे बोलत होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र हे प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहील असा विश्वास मला वाटतो. देशाची सत्ता जरी वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात असली तरी काही हरकत नाही. प्रत्येक राज्यातली परिस्थिती ही वेगळी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. केंद्रातील सत्ता जरी दुसऱ्यांकडे असली तरी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य असून केंद्राने कुठलाही दुजाभाव करू नये आणि ते तसे करणारही नाहीत अशी अपेक्षा आहे, कारण लोकांच्या मनात केंद्र आणि राज्यात वेगवेगळे सरकार येणार असल्याने शंका उपस्थित होत आहेत.'

असा लाजिरवाणा विक्रम करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री

पवार पुढे म्हणाले, हे राज्य माझं आहे आणि या राज्याचं नेतृत्व करणारी माणसं ही माझ्या घरातल्या माणसांसारखी आहेत. आज या बैठकीच्या नंतर आपले तीन प्रतिनिधी राज्यपालांकडे जाऊन आपल्या आमदारांच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा करतील, आणि आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात यावे या संबंधित निवेदन देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच, येणाऱ्या 1 तारखेला शिवतीर्थावर शपथविधीचा सोहळा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

कालीदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी

यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदी नेते उपस्थित होते.

सस्पेंस थ्रिलर नंतरचा महासत्ता अंक

दरम्यान, बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार असून 20 वर्षानंतर सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. महाविकासआघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली असून ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती महाराष्ट्रातील सरकारचे नेतृत्व करणार आहे. आघाडीतल्या मित्रपक्षांसह तीन पक्षांची महाराष्ट्र विकास आघाडी हे सरकार स्थापन करणार आहे. ट्रायडंट हॉटेलमधील तिन्ही पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.