Sharad Pawar on Sunil Shelke: "...तर याद राखा शरद पवार म्हणतात मला"; कार्यकर्त्यांसमोरच सुनील शेळकेंना पवारांचा कडक इशारा

शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या सुनील शेळके यांना शरद पवार यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
Sharad Pawar_Sunil Shelke
Sharad Pawar_Sunil Shelke

लोणावळा : शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या सुनील शेळके यांना शरद पवार यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. लोणावळ्यातील कार्यकर्ता सभेत संबोधित करताना त्यांनी आक्रमक होत भाषण केलं. यावेळी अजित पवारांसह भाजपवर त्यांनी सडकून टीका केली. (Sharad Pawar big comment on Sunil Shelke gave a stern warning in front of ncp workers at Lonavala)

Sharad Pawar_Sunil Shelke
Maratha Reservation: निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिलंय का? हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

सुनील शेळकेंना इशारा देताना शरद पवार म्हणाले, "तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. ज्यानं ही सही केलीए त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता.

माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा तुम्ही दमदाटी केलीत आता बास्स, पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला... मी खरंतर तर या रस्त्यानं जात नाही पण जर या रस्त्यानं जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर त्याला सोडतही नाही" (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar_Sunil Shelke
Maratha Reservation: निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिलंय का? हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

शेळकेंनी नेमकं काय केलंय?

लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावलं आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडं केली. त्यामुळं शरद पवारांनी जाहीर सभेतून शेळके यांना असं पुन्हा केल्यास माझ्याशी गाठ असल्याचा इशारा दिला. (Latest Marathi News)

Sharad Pawar_Sunil Shelke
Varsha Gaikwad: काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं घडलंय काय?

पवारांच्या विधानावर शेळके काय म्हणाले?

शरद पवारांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना शेळके म्हणाले, "आम्हाला शरद पवारांबद्दल आजही आदर आहे. भविष्यात देखील राहणार आहे. त्यांनी असं का वक्तव्य केलं याची मला कल्पना नाही. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी अजितदादांसोबत खंबीरपणे उभा राहणार. आजही आहे आणि उद्याही राहणार. मावळ तालुक्यातील मायबाप जनता सुज्ञ आहे, त्यांना जे वाटेल त्यांना ते मतदान करतील. (Marathi Tajya Batmya)

परंतू शरद पवारांसोबत असलेले स्वयंघोषित नेते आज माझ्या मतदारसंघात येऊन वक्तव्ये करत आहेत. मी जर असं केलं असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करेन. पण शरद पवार मावळ तालुक्यात येत असताना त्यांच्यासोबत अनेक नेते येऊनही जर त्यांच्यासोबत ५० कार्यकर्ते येत नसतील उलट शिवसेनेचे कार्यकर्ते आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com