Sharad Pawar : छ. संभाजी महाराज धर्मवीर? अजितदादांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar

बारामती - छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका करत ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Sharad Pawar news in Marathi)

Sharad Pawar and Ajit Pawar
Chhagan Bhujbal : मी 'त्याचा' अभ्यास करतोय; अजित पवारांच्या संभाजी महाराजांवरच्या वक्तव्यावर भुजबळ स्पष्टच बोलले

शरद पवार म्हणाले की, अजित पवारांचं संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिलं. पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेलं लिखान कोणालाही पसंत पडणारं नाही. पण ते कधीकाळी लिहिलेलं होतं ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही.

Sharad Pawar and Ajit Pawar
Nussrat Jahan : कडाक्याच्या थंडीत खासदार बाईनं चाहत्यांना फोडला घाम! फोटो आहेच तसा..

स्वराज्यरक्ष की धर्मवीर याबाबत पवार म्हणाले की, ज्या नागरिकांना, व्यक्तींना, घटकांना संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करणं चुकीचं नाही. तर काही घटकांना संभाजीराजे धर्मवीर म्हणून पाहात असेल तर त्याविषयी तक्रार करण्याचं कारण नाही.

पवार पुढं म्हणाले की, जेव्हा मी ठाण्याला जातो तेव्हा धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यामध्ये आनंद दिघे सहकारी होते. त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख करण्यावर माझा आक्षेप नाही.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com