esakal | अजित पवारांचा तो निर्णय कुटुंबात कोणालाही पटला नाही- शरद पवार

बोलून बातमी शोधा

Sharad pawar clarifies about Ajit Pawar on he takes oath as dy CM

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय कुटुंबातील कोणालाच पटला नव्हता. तसेच, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर दबाव येऊ लागल्याने अजित पवारांना निर्णय बदलावा लागल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अजित पवारांचा तो निर्णय कुटुंबात कोणालाही पटला नाही- शरद पवार
sakal_logo
By
वृत्तसेवा

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय कुटुंबातील कोणालाच पटला नव्हता. तसेच, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर दबाव येऊ लागल्याने अजित पवारांना निर्णय बदलावा लागल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शरद पवार म्हणाले, 'महिनाभरात काही गोष्टी आपोआप घडत गेल्या. सकाळी मला घरून फोन आल्यानंतरच कळाले की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मला काहीही माहित नव्हते, मी झोपीत होतो. मला सकाळी सुप्रियाकडूनही याबाबत माहिती मिळाली. परंतु यानंतर मला खात्री होती की, राजकारणात मतभिन्नता असली तरी कुटुंब फुटणार नाही ही माझी खात्री होती असेही पवार यांनी सांगितले. 

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

दरम्यान, शिवसेना भाजपसोबत जाण्यास तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर मी कोणत्याही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही. मी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं मत काय आहे, याची चिंता होती. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत मी बोलावं, अशी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची इच्छा होती, अशी माहितीही यावेळी शरद पवारांनी दिली.

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

काँग्रेसचा शिवसेनेच्या विचारधारेला नेहमीच विरोध होता. मात्र सोनिया गांधींसोबत मी काही मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर थोडा विरोध होता. त्यावेळी मी सोनिया गांधी यांना काही घटना सांगितल्या. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, याची आठवण मी त्यांना प्रथम करुन दिली. आणीबाणीनंतर झालेल्या राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊन एकही उमेदवार उभा न करण्याची महत्त्वाची भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांनी काँग्रेससाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतल्याचं मी त्यांना सातत्याने सांगितलं, असं शरद पवारांनी सांगितलं.