NCP Crisis: 'निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्या....', शरद पवार गटाच्या नेत्याची अजित पवार गटाच्या नेत्यावर जहरी टीका

निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी अशी टीका अजित पवार गटाच्या नेत्यावर केली आहे
NCP Crisis
NCP CrisisEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही, असं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी अशी जहरी टीका अजित पवार गटाचे नेते महेश शिंदेंवर केली आहे.

अजित पवार गटाचे नेते महेश शिंदे यांनी 'आम्ही अपात्र होणार अशी स्वप्न पाहणारेच अपात्र होतील',अशी टीका शरद पवार गटावर केली होती. त्याला शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, आम्ही शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण त्याच्यामुळे आम्ही राजकारणात आलो. त्यांच्यामुळे पद मिळालं. आता त्यानंतर त्यांच्यासाठी काहीही त्याग करण्याची आमची तयारी आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

NCP Crisis
Chandrashekhar Bawankule: 'बातम्या एकतर्फी जाईल असं मी...', व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

पुढे ते म्हणाले की, पण, जे निष्ठा विकून विष्ठेसाठी गेले आहेत. त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये. त्यांनी त्यांच्या अपात्रतेची काळजी करावी. ते अपात्र होणार आहेत. दुर्दैवाने ते अपात्र झाले नाही. तर ते जनतेच्या दरबारात मतदानावेळी अपात्र होतील, हे मी तुम्हाला आज जाहीररीत्या सांगतो असंही शशिकांत शिंदे पुढे म्हणाले आहेत.

त्यामुळे त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये. कारण आम्ही निष्ठावंत आहोत. त्यामुळे आमची त्याग करण्याची तयारी आहे. तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी प्रंचड मताने जिंकणार आहे, असंही शशिकांत शिंदे पुढे म्हणाले आहेत.

NCP Crisis
Devendra Fadnavis : विपर्यास केला गेला! फडणवीसांच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Congress Faces NCP Protest in Pune After Alleged Offensive Statement on Deputy Chief Minister Sunetra Pawar
Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com