पवारांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यासाठी दिल्ली दरबारी रचले होते कट कारस्थान - प्रफुल्ल पटेल

sharad pawar not become prime minister only due to congress says praful patel
sharad pawar not become prime minister only due to congress says praful patel

नागपूर : राजीव गांधींच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस बहुमताजवळ असताना पंतप्रधानपदी शरद पवार यांना निवडले जावे, असा एक मतप्रवाह होता. मात्र, 'दिल्ली दरबारी' पवारांना रोखण्यासाठी अनेक कट कारस्थाने सुरू होती. निवडणुकांच्या आधी पवार नको म्हणून नरसिंह राव यांना पवार यांच्या विरोधात अध्यक्षपदी बसवण्यात आले. निवडणुकांनंतरही सोनिया गांधी यांच्या नावाचा वापर, गैरवापर करून पंतप्रधानपदीही नरसिंह राव यांनाच काँग्रेसने पसंती दिली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण हे महत्वाचे खाते देऊन पवारांनी देऊन त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यांचे पंतप्रधानपद कसे आणि कोणामुळे दूर गेले हे मी पाहिले आहे, असे आरोप प्रफुल्ल पटेलांनी केला आहे. पटेलांनी पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त एका वृत्तापत्रामध्ये लिहिलेल्या लेखात हे आरोप केले आहेत.

काँग्रेसची काम करण्याची पद्धत 'सुनियोजित बंड' घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. पहिला फटका पवारांना 1989 ला आर के धवन, माखनलाल फोतेदार यांनी मोठे षडयंत्र करून देण्याचा प्रयत्न केला जो पवारांनी फोल पाडला, असंही पटेलांनी म्हटलंय. 1996 मध्ये पवार पंतप्रधान असणारी काँग्रेस सरकार बनू शकत असतानाही फक्त नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार बनली. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल पटेलांनी केला आहे.

नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतरही शरद पवार त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे राव यांच्या मनात त्यांच्याविषयी कायमच अढी होती. पवार यांचे पक्षातील महत्व कसे कमी करायचे याच विचारात असताना मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलींची कारणे देत पवार यांना महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधाकरराव नाईक यांना हटवायचेच असल्याने पवार यांना मोठेपणा देत असल्याचा बहाणा बनविण्यात आला. त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घ्यायला लावली. महाराष्ट्रातील परिस्थिती बघून पवारांनीही त्यावेळी महाराष्टात परतण्याचा निर्णय घेतल्याचे पटेलांनी त्या लेखात म्हटले आहे. 

केसरीच्या वेळी जेव्हा गुजराल पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही आमच्या नजरेसमोर पवारांनी आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षांचा गळा पक्षासाठी दाबला. सॉफ्ट स्टँड घेतला आणि अगदी सोपे असलेले पंतप्रधान पद सोडले हे आम्ही बघितले आहे. 13 दिवसांत पडलेले वाजपेयी सरकार फक्त पवारांमुळे पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही, असं पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसने अपमान केला. पार्लियामेंटरी पार्टीचे मुख्य बनवून त्यांनाच अंधारात ठेवले जायचे. महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडवल्या जायच्या, असे आरोप देखील प्रफुल पटेल यांनी केले आहेत.

आज 80व्या वर्षात पवार साहेबांना ज्या पदावर पाहायचं आहे ते अजून पाहिलेलं नाही. जर महाराष्ट्रानं ठरवलं साथ दिली तर हे शक्य होऊ शकतं जर ममतांचे 36 खासदार निवडून येऊ शकतात. जगनमोहन यांचे 28 खासदार निवडून येऊ शकतात, तर महाराष्ट्रांचे 48 खासदार पवारांच्या मागे का उभे राहू शकत नाही? जेव्हा आपण पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस साजरा करू. त्यावेळी आपलं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आणि या सबंध महाराष्ट्रात पवार साहेबांवर प्रेम केलं आहे. पण पवार साहेबांच्या मागे राहिलेलं नेतृत्व करू शकतात ती मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलंय.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com