''त्रिपुरा हिंसाचार घडला म्हणून महाराष्ट्रात असं घडणं योग्य नाही''

sharad pawar
sharad pawaresakal

नाशिक : त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडलं म्हणून महाराष्ट्रात अस घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना बंदचा निर्णय नैराश्यातून सार्वजनिक शांततेला धक्का बसेल अस काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत, हे दुर्दैव आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. शरद पवार आज रविवारी (दि. १४) आणि सोमवारी (दि. १५) नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार नाशिक दौऱ्यावर येत असल्याने ते पदाधिकाऱ्यांशी या निवडणुकांबाबत गुफ्तगूदेखील करणार असल्याची चर्चा आहे.

मंत्र्यांवर होणाऱ्या ED चौकशीबाबत शरद पवार म्हणाले...

विरोधकांच्या दृष्टीने ही भावना झाली की अस होणारंच. अधिकाऱयांचा यासाठी वापर केला जातो. वरिष्ठ अधिकाऱयांचा यात सहभाग आहे. नक्षलवाद ट्रेंड महाराष्ट्रत वाढतोय अस नाही. खरोखरच नक्षलवादी विचार ज्यांनी विचार स्वीकारले तो वेगळा आहे. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदीवासी वर काही अन्याय झाला असेल तर त्यांना नक्षलवादी ठरवता, मात्र या वर बॅलन्स ठेवायला हवा, माझ्या दृष्टने केवळ कायदा सुव्यवस्था प्रश्न नाही, सोशीत लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बाळाचा वापर करूनच हा प्रश्न सुटेल अस बोलणं हे असत्य आहे . तिकडे विकास करायला हवा त्यांना संधी द्यायला हवी.

sharad pawar
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

एसटी आंदोलनाबाबत शरद पवार म्हणाले...

तीन चार राज्याच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं आहे. याचा फटका सामान्यानांच बसतो तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा अस म्हणणे अयोग्य आहे. न्यायालयाने देखील या बाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही, असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय. कामगार संघटना आणि राज्यसरकारने एकत्र बसून यावर तोडगा काढावा. एकादशीला असंख्य लोक वारीला जाता आज त्यांचेही हाल आस्तेला धक्का बसविण्याच काम केलं जातंय

sharad pawar
Railway PRS system | पुढील 7 दिवस प्रवासी आरक्षण प्रणाली बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com