अजित पवारांच्या ट्विटला शरद पवारांचे सणसणीत उत्तर; म्हणाले...

टीम-ई-सकाळ
Sunday, 24 November 2019

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मी राष्ट्रवादीतच असून, शरद पवारच आमचे नेते' आहेत. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करत सणसणीत उत्तर दिले आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मी राष्ट्रवादीतच असून, शरद पवारच आमचे नेते' आहेत. भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात स्थिर सरकार देणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्विट करत सणसणीत उत्तर दिले आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. अजित पवार यांचे वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणार आहे. जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याच्या आणि संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी ते वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी हे ट्विट करून स्पष्ट केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस कदापि भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन करणार नाही. पवारांचे हे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनीही रिट्विट केले आहे.

अजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते पदावरून हकालपट्टी झालेल्या अजित पवार यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांची बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या या ट्विटमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, शरद पवार यांनी काल सकाळपासून अजित पवार यांच्या निर्णयामागे राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नसल्याचं आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण, अजित पवार यांच्या या ट्विटमुळं शरद पवार यांच्या भूमिकेविषयी परत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणतात; मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवार यांना उत्तर दिले आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar replied Ajit Pawars Confusing Tweet About Government Formation