शरद पवार म्हणतात, 'न्यायमूर्ती लोयाप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी'

वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

न्यायामूर्ती लोया प्रकरणाबद्दल मी वर्तमानपत्रात वाचलं आहे, याविषयी काही लेखही वाचले आहेत. काही लेख वाचल्यावर या प्रकरणाच्या खोली समजते यावरून या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हायला हवी असे वाटते असे राष्ट्रावादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पुणे : न्यायामूर्ती लोया प्रकरणाबद्दल मी वर्तमानपत्रात वाचलं आहे, याविषयी काही लेखही वाचले आहेत. काही लेख वाचल्यावर या प्रकरणाच्या खोली समजते यावरून या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हायला हवी असे वाटते असे राष्ट्रावादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

महाराष्ट्रात अशी चर्चा आहे की न्यायमूर्ती लोया प्रकरणाची चौकशी पुन्हा व्हावी अशी चर्चा आहे, यावर तुम्हाला काय वाटते या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले की, मला यासंबधी जास्त काही माहिती नाही. परंतु, मी या विषयी टीव्हीवरील चर्चा आणि वर्तमानपत्रात वाचले आहे ऐकले आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील जनतेत चर्चा असते, परंतु मला याविषयी जास्त काही माहिती नाही.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

लोकांची याविषयी चौकशी व्हावी अशी जर मागणी असेल तर या प्रकरणाचा नव्याने विचार करायला हवा. कोणी जर अशी मागणी करत असेल तर ते कुठल्या आधारावर या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी म्हणून मागणी करत आहेत याचाही विचार करावा लागेल असेही पवार यांनी सांगितले. परंतु या प्रकरणात कुठलेही तथ्य नसेल तर अशा प्रकारचे आरोप कोणावर लावणेही तितकेच चुकीचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

या मुलाखतीत पवार यांनी अनेक गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी आपल्याला याविषयी कल्पना नसल्याचे म्हटले आहे. या राजकीय भूकंपाबाबत पवार म्हणाले, भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळं करण्यास तयार आहोत असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Wants detail Inquiry of justice loya case