नव्या सरकारची उद्या बहुमत चाचणी; काय असेल शिंदे सरकारचा प्लॅन?

उद्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

मुंबई : महाराष्ट्रात १ जुलै रोजी नवं सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत नव्या सरकारची स्थापना केली आहे. या सरकारला उद्या बहुमत चाचणीसाठी सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांच्या बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली असून भाजप आणि शिंदे गटाचीही बैठक पार पडली आहे.

(New Government Floor Test Updates)

उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी भाजप शिंदे यांच्याकडून आपापल्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं असून उद्यासाठी रणनीती ठरवण्यात आली आहे. यासंदर्भाती माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे. शिवसेना आणि भाजप सरकारकडे बहुमत असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल हे सांगता येत नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. बहुमत असले तरी आपल्याकडील सर्व आमदारांना आपल्या बाजूने मत करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान शिवसेनेने आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना ३९ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

Eknath Shinde
झिरवाळांबाबतच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण; म्हणाले...
Eknath Shinde
"OBC आरक्षणासकट येणाऱ्या निवडणुका होणार"; हसन मुश्रीफ म्हणाले...

भाजपसोबतंच राष्ट्रवादीच्या आमदारांचीही बैठक पार पडली आहे. यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणाचा आढाव घेतल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली तर येत्या सहा महिन्यात मध्यावधी निवडणुकांना तयार राहा असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आज नव्या सरकारसाठी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली असून त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत शिंदे फडणवीस सरकारकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये भाजपच्या नार्वेकरांना १६४ तर साळवी यांनी फक्त १०७ मतं मिळाली होती. नार्वेकरांची महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभागृहात भाषणं करताना अनेक विरोधक नेत्यांनी नव्या सरकारवर फटकेबाजी केली. तर उद्या या नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com