'सुषमा अंधारे निष्ठा शिकवत असतील तर दुर्दैव, उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलं नाही'

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चांगलंच मैदान गाजवलं आहे.
SushmaAndhare #ShambhurajDesai
SushmaAndhare #ShambhurajDesaiesakal
Summary

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चांगलंच मैदान गाजवलं आहे.

सातारा : शिवसेना (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात पार पडला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बीकेसीवरून प्रत्युत्तर दिलं. मात्र, या सगळ्यात शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) चांगलंच मैदान गाजवलं. अंधारेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

SushmaAndhare #ShambhurajDesai
Akola : आठवलेंच्या 'त्या' वक्तव्याची प्रकाश आंबेडकरांनी इज्जतच काढली; म्हणाले, काही महाभाग..

सुषमा अंधारे या एक महिन्यापूर्वी शिवसेनेत आल्या आणि उपनेत्या झाल्या. आता त्या आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलेलं नाही. त्यामुळं आता जो पक्षात येईल, त्याला पद मिळत आहे, जो येईल त्याला थेट मातोश्रीवर प्रवेश मिळतो आहे, असं प्रत्युत्तर देसाईंनी दिलं.

SushmaAndhare #ShambhurajDesai
VIDEO : 'जय श्रीराम'चा नारा देत मदरशात जबरदस्तीनं घुसखोरी; 4 जणांना अटक

सुषमा अंधारेंनी वाटेल तसा प्रचार करावा. मात्र, लोकांना जो योग्य वाटेल त्यांनाचा पाठिंबा मिळेल, असा घणाघातही त्यांनी अंधारेंवर केला. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. शिंदे गटातील नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. या टीकेला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com