सरकारने माझा 'विधी' करण्याची तरतूद करावी; सेनेच्या आमदाराची नाराजी

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray
Summary

शिवसेना आमदाराने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सभागृहात आक्रमक होत सरकारलाच घरचा आहेर दिला.

मुंबई - मिठी नदीच्या काठावर क्रांतीनगरसह आजुबाजूच्या परिसरात पूरबाधितांची फसवणूक झाल्याचं म्हणत शिवसेना आमदाराने राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सभागृहात आक्रमक होत सरकारलाच घरचा आहेर दिला. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्याच पक्षाचे असलेल्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

दिलीप लांडे यांनी उद्विग्न उद्गार काढत म्हटलं की, कदाचित सभागृहातील हे माझं शेवटचं भाषण असेल. MMRDA ने तयार केलेली घरे माझ्या लोकांना मिळाली नाहीत. आता ते वाहून जातील किंवा त्याआधी मी स्वत: वाहून जाईन असेही लांडे यांनी म्हटलं. अर्थसंकल्पावर बोलताना लांडे यांनी नाराजी व्यक्त करताना असंही म्हटलं की, माझा 'विधी' करण्याची तरतूद सरकारने करावी.दिलीप लांडे यांच्या नाराजीवरून बोलताना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की दिलीप लांडे यांच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही. त्यांनी सांगितलं की, नगरविकास मंत्री म्हणून सांगतो दिलीप लांडे यांच्यावर ही वेळ येऊ देणार नाही. पूरबाधितांना आणि फसवणूक झाली असलेल्यांना लवकरच घरे दिली जातील.

CM Uddhav Thackeray
'द काश्मिर फाईल्स' महाराष्ट्रात करमुक्त नाहीच; अजित पवार म्हणाले..

शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी एमएमआरडीएच्या मुख्यालयावर तीन आठवड्यापूर्वी मोर्चा काढला होता. आयुक्तांना भेटण्यासाठी ते निघाले असताना अडवण्यात आले होते. हक्काची घऱे मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीनगर, मिठी नदीच्या काठावर असलेल्यांना हक्काची घरे मिळत नसल्यानं त्यांनी राज्यसरकारवर टीका केली होती.

क्रांतीनगर परिसरातील लोकांची फसवणूक केली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच प्लास्टिकच्या खोट्या चाव्या दिल्या, मात्र आजपर्यंत एकाही पूरबाधिताला घर मिळालं नाही. पूरग्रस्त, ज्यांच्या घऱावरून पाणी वाहतं त्यांची फसवणूक झालीय आणि त्या १०० लोकांना ज्या प्लास्टिकच्या चाव्या देण्यात आल्यात त्यांना हक्काचं घर मिळावं, पाणी लाइट मिळावी यासाठी त्या लोकांच्या भावना मांडत असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्री एमएमआरडीएचे अध्यक्ष आहेत. पण आधीच्या मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिले ते पूर्ण करावे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेय त्यांनी ते पूर्ण केलंच पाहिजे अशी मागणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com