

Uddhav Thackeray Whip
esakal
Shiv Sena MPs Meeting : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या लोकसभेतील सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. उद्या, रविवार (ता. २९) रोजी सायंकाळी ४ वाजता नवी दिल्लीतील संसद भवन परिसरातील पक्ष कार्यालयात होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीला सर्व खासदारांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.