Shivaji Maharaj: भारत - पाक सीमेवर उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जम्मू काश्मीरला रवाना!

राज्‍यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahadsakal

Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांमधून तरुणांना प्रेरणा तर मिळेलच, शिवाय गडकिल्ल्यांचा विकास झाल्यास त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जम्मू-काश्मीर, कुपवाडा येथे उभारण्यासाठी नुकताच राज भवन येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. यावेळी राज्यपाल बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, तसेच रथपूजनही करण्यात आले.

शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचे फोर्ट सर्किट तयार करावे. तसेच पर्यटकांना सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करावे, अशी सूचनाही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केली. ‘आम्ही पुणेकर फाऊंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती’ यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे.

40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
Shivaji Park : शिवाजी पार्क मिळणार कोणाला? पालिका दोन-तीन दिवसांत घेणार निर्णय

अनेक राजांनी स्वतःसाठी राजमहाल बांधले; परंतु शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी राजमहाल न बांधता राज्य रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. महाराजांचे नाव घेऊन आपण प्रतापगडावर साडेपाचशे पायऱ्या चढून गेलो, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावर्षी ४ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे नमूद करून शिवाजी महाराजांची दृष्टी त्यांच्या काळाच्या फार पुढे होती. जुलमी मुघल राजवटीतून राज्य मुक्त करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न महाराजांनी पाहिले, असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘आम्ही पुणेकर फाऊंडेशन’चे विश्वस्त अभयसिंह राजे शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव, राजेंद्र खेडकर, तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
Mumbai: मुंबईला छावणीचं स्वरुप! दसरा मेळाव्यामुळे 12 हजार पोलिसांची कडेकोट सुरक्षा, 'अशी' असेल पार्किंगची व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com