Shivajirao Adhalrao Patil I आढळराव पाटील शिवसेनेतच! दिलगिरी व्यक्त करत पक्षाने केलं स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivajirao adhalrao patil

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचं सागंण्यात आलं होतं.

आढळराव पाटील शिवसेनेतच! दिलगिरी व्यक्त करत पक्षाने केलं स्पष्ट

शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी बातमी माध्यामांंमधून प्रसिद्ध करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचं सागंण्यात आलं होतं. मात्र शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील अजून शिवसेनेत कार्यरत आहेत. 'सामना' वृत्तपत्रात छापण्यात आलेली बातमी अनावधनाने प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे आज शिवसेनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. (shivajirao adhalrao patil stay in shiv sena)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात सामील होत पक्षविरोधी काम केल्याचा ठेपका ठेवत पाटील यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचं सांगण्यात आलं होतं. शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी बंडखोर आमदारांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कारवाईचं सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. (maharashtra politics)

दरम्यान, बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता शिवसेनेने या घटनेचे स्पष्टीकरण दिले असून माफी मागितली आहे.

Web Title: Shivajirao Adhalrao Patil Stay In Shiv Sena Party Apologised To Adhalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top