Shivsena Amol Khatal: ''आमदार असूनही मला रस्त्यावर उतरावं लागतंय...'' सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची धडक कारवाई
Maharashtra government: संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर रविवारी रात्री आमदार अमोल खताळ हे एक कार्यक्रम आटोपून माघारी येत होते. वाटेत त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारं वाहन दिसलं.
Sangamner News: "मला आमदार असूनही रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागते, मग प्रशासन झोपलंय का? असं म्हणत संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी खंत व्यक्त केली. अवैध वाळू तस्करांचा पाठलाग करत आमदार खताळ यांनी धडक कारवाई केली आहे.