उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला 'हा' संदेश; बैठक संपली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

राज्याचा मुख्यमंत्री कोण यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज (गुरुवार) शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसायचं की उपमुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेत सहभागी व्हायचं याचा निर्णय होण्याची शक्यता होती.

मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी जे ठरलं आहे, तसेच होईल. सर्व आमदारांनी एकत्र राहा आणि शांत राहा असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच पक्षाची भूमिका मांडण्याचे पूर्ण अधिकार संजय राऊत यांना दिले आहेत. 

मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

राज्याचा मुख्यमंत्री कोण यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज (गुरुवार) शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसायचं की उपमुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेत सहभागी व्हायचं याचा निर्णय होण्याची शक्यता होती. पण, शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. मातोश्रीला पोलिस छावणीचे स्वरूप आलं होते. 

फडणवीसांच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन व्हावं : नितीन गडकरी

बैठकीनंतर शिवसेना आमदारांनी म्हटले आहे, की लोकसभेची युती करताना जे ठरलं होते तसेच व्हावे अशीच आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. उद्धव ठाकरेंना पूर्ण अधिकार आहेत. सर्व एकत्रित राहा आणि शांत राहा असा संदेश आहे. भाजपशी चर्चा करण्याचा प्रश्नच नाही. आमचा एकही आमदार फुटणार नाही. भाजपला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray meets newly elected MLAs in Mumbai