'आदित्य रश्मी उद्धव ठाकरे', मतदानावेळी केला आईचा उल्लेख|Vidhan Sabha Speaker Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aditya thackeray

'आदित्य रश्मी उद्धव ठाकरे', मतदानावेळी केला आईचा उल्लेख

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर रिंगणात असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना स्वत:चे पुर्ण नाव ‘आदित्य रश्मी उद्धव ठाकरे’ सांगितले. पण तुम्हाला माहिती आहे का आईचं नाव का लावलं जातं? आणि हे केव्हापासून सुरू झालं? (aditya thackeray mentioned rashmi thackeray name while self introduction in vidhan sabha speaker election)

हेही वाचा: Maharashtra Assembly Live: सुधीर मुनगंटीवारांनी नार्वेकरांसाठी सादर केली कविता

मुलाच्या आयुष्यात आईवडील दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे वडिलांना जितका मुलांवर अधिकार आहे तितकाच आईचाही आहे. पितृसत्ताक पद्धतीची अशी ही विचारसरणी आहे, जी अनेक वर्षं चालत आली आहे. त्यातूनच मुलांच्या नावामागे फक्त वडिलांचे नाव लावण्याची पद्धत होती. मात्र काळानुसार आणि शिक्षणामुळे अनेक मुलं आई वडिलांना समान ठेवत आपल्या नावामागे आईचं आणि वडिलांचं नाव लावतात.

हेही वाचा: शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाचा राहुल नार्वेकरांना पाठिंबा

मुळात हा ओळख आणि समानतेचा संघर्ष आहे. कोणत्याही फॉर्मवर वडिलांचं नाव त्यानंतर आईचं नाव असतं. पण हे चुकीचं आहे. "प्रत्येक क्षेत्रात आता महिला समोर आहेत. घर चालवण्याचं काम फक्त पुरुषच करत नाही तर महिलाही बरोबरीने करतात अशा परिस्थितीत त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष का केलं जातं, हा प्रश्न अनेकदा निर्माण होतो.

हेही वाचा: आम्ही जावईहट्ट पुरवत आलोय, अजितदादांची विधानसभा अध्यक्षांपुढे फटकेबाजी

सिंगल आईला सुद्धा अनेकदा मुलांसमोर नाईलाजाने वडिलांचं नाव लावावं लागतं. घटस्फोट झालेल्या सिंगल आईला आपल्या मुलांच्या नावासमोर वडिलांचे नाव लावण्याचा आग्रह केला जातो.

बदलत्या काळात आणि बदलत्या विचारणीसोबत हल्ली तरुणपिढी या विचारसरणीला बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याचे अनेक उदाहरणे आज आपल्याला विविध क्षेत्रात पहायला मिळतात याशिवाय सोशल मीडियावरही आईचं नाव नावामागे लावल्याचे अनेक उदाहरणे दिसतात.

Web Title: Shivsena Leader Aditya Thackeray Mentioned Rashmi Thackeray Name While Self Introduction In Vidhan Sabha Speaker Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..