संजय राऊत यांनी केले ट्विट अन् त्यावर नवाब मलिकांचे रिट्विट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत नाराजी दर्शविली होती. तसेच काल रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनीही अजित पवार परत येतील असा विश्वास व्यक्त केला होता.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजही (रविवार) पुन्हा एकदा ट्विट करत Accidental शपथग्रहण असे म्हटले आहे. त्या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे, की ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे, इक आग का दरिया है और डूब के जाना है। जिगर.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या दोन्ही नेत्यांच्या ट्विटमुळे महाराष्ट्रातील राजकीय लढाई सोपी नसल्याचे स्पष्ट होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. 

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत नाराजी दर्शविली होती. तसेच काल रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनीही अजित पवार परत येतील असा विश्वास व्यक्त केला होता. आता आज महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोड घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweet about BJP Government formation