Shivsena nitin gadkari saamana editorial maharashtra politics
Shivsena nitin gadkari saamana editorial maharashtra politics

गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा...सामनातून स्तुतीसुमने

आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत शिवसेनेने केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक

सत्तानाट्यानंतर राज्यातील राजकारणाला नवं वळण लागलं आहे. शिवसेनेचे कट्टर नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. दरम्यान, नेहमी भाजपवर निशाणा साधणाऱ्या शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. (Shivsena nitin gadkari saamana editorial maharashtra politics)

नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळय़ा गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. अशा शब्दात गडकरींचे कौतुक करत गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे. असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

Shivsena nitin gadkari saamana editorial maharashtra politics
'अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!'

काय म्हटले आहे अग्रलेखात?

राष्ट्राच्या आकांक्षा जशा महाकाव्यात प्रकट व्हाव्यात तसे नाथ पैंच्या वक्तृत्वातून आमच्या सर्वांचे पडसाद उमटतात असे एकदा कवी वसंत बापट म्हणाले होते. अलीकडे नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांतून लोकभावनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गडकरी यांचे नागपूरचे भाषण सगळय़ांनाच विचार करायला लावणारे आहे.

‘‘सध्या ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे,’’ अशी निरवानिरवीची भाषा गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे.

Shivsena nitin gadkari saamana editorial maharashtra politics
शिवसेना X मोदी सरकार : आदित्य ठाकरेंच्या कार्यकाळातील कामाचं केंद्राकडून ‘ऑडिट’

सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असहय़ होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे आहे. काही माणसे आयुष्यभर जीवनमूल्यांकरिता संघर्ष करतात, मात्र ती राजकारणात यशस्वी ठरतातच असे नव्हे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळय़ा गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. गडकरी हे स्वतःला सध्याच्या राजकारणात ‘फिट’ मानत नाहीत. सभोवती गारद्यांचा गराडा आहे व हाती अनीतीच्या तलवारींचा खणखणाट सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ गडकरींनी नागपुरात मन मोकळे केले असे दिसते. अशा शब्दात गडकरींची बाजू मांडत शिवसेनेने गडकरींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

सध्याचे राजकारण हे विचारांचे, नीतिमत्तेचे राहिलेले नाही. गडकरी यांनी गांधी काळातील राजकारणाचा उल्लेख केला, पण भारतीय जनता पक्षाला मान्य नाहीत. तरीही गडकरी गांधींचा संदर्भ देतात हे महत्त्वाचे. असे म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

माणसे विकत घेणे व माणसांची बोली लावणे हाच राजकारणाचा धर्म बनला आहे. या वातावरणात नितीन गडकरी यांचे बोलणे थोडे निराशेचे असले तरी मनगटांत चेतना निर्माण करणारेही आहे. सध्याच्या पेंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळय़ात अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत.

Shivsena nitin gadkari saamana editorial maharashtra politics
...हा तर खोटारडेपणाचा कळस

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकले तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आले. गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा ‘ईडी’सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केले गेले. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता. गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत. त्यांची अस्वस्थता अधूनमधून व्यक्त होत असते, पण त्यासाठी व्यासपीठ नागपूरचेच असते हे विशेष.

नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे! असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com