CM ठाकरेंच्या संवादानंतर राऊतांचे ट्वीट; म्हणाले, होय..

Sanjay Raut on
Sanjay Raut on esakal
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे, या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी होय संघर्ष करणार!! असे ट्वीट केले आहे.

Sanjay Raut on
राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; ज्यांना मी नकोय त्यांनी...

दरम्यान आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदारांना भावनिक साद घातली आहे, सत्तेसाठी एकत्र आलो. शरद पवार, सोनिया गांधी यांनी विश्वास दाखवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचं? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको, तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतोय, असे ते म्हणाले.

Sanjay Raut on
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत?

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, पण हे समोर येऊन बोला. ते म्हणाले की, एकदा ठरवू या समोर या सांगा. आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपलं मानतो त्यांनी मला सांगावं, मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Why are farmers opposing Shaktipeeth Highway?
 Tukaram Mundhe
Conservation Success Story: Vulture Covers 3,334 Km from Maharashtra to Rajasthan
Marathi News Esakal
www.esakal.com