esakal | आषाढी एकादशी विशेष : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मिळणार पुर्वीचे रुप  

बोलून बातमी शोधा

pandhrpur.jpg

१)राज्य पुरातत्त्व खात्याच्या पॅनलवरील आर्किटेक्टची टीम यावर अभ्यास करणार. 
२) पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह २८ मंदिराचा होणार कायापालट. 
३) थर्मोग्राफीद्वारे हे तज्ञ मूर्ती, भिंतीवरील गळती, भेगा, आणि अन्य धोके शोधतील.

आषाढी एकादशी विशेष : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मिळणार पुर्वीचे रुप  
sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद :  जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेरा आपुलिया !
                    सर्व सुकृताचे फळ मी लाहीन ! क्षमा मी देईन पांडुरंग ! 
                 बाप रुखमादेविवरू विठ्ठलाची भेटी ! आपुले सेवेसाठी करुनी ठेला !

आज आषाढी एकादशी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री. विठू रुखमाईच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरात हजर होतात. यंदा कोरोनाच्या सावटामुळे घरोघरी पंढरीवारी साजरी होत आहे. ही बाब असताना मात्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या मंदिराला येत्या काळात पूर्वीचे रूप प्राप्त होणार आहे. राज्य पुरातत्व खात्याच्या पॅनलवरील वास्तुविशारद तज्ज्ञांची आठ जणांची टीम पंढरपुरात दाखल होणार आहे. धोक्यात आलेल्या मंदिर, मूर्तीची थर्मोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करून उपाययोजना करणार आहेत. या उपाययोजनामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह समितीच्या ताब्यात असलेल्या २८ मंदिरांचा कायापालट होणार आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

भाविकांची सातत्याने असलेली गर्दी, देवाच्या मुर्तीला होणारा स्पर्श, बदलते तापमान, आर्द्रता, गळती, दिवाबत्ती, वारा यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर धोक्याची घंटा घोंगावत आहे. हे धोके ओळखून त्यावर उपाय सुचवण्यासाठी राज्य पुरातत्त्व खात्याच्या पॅनलवरील आर्किटेक्टची टीम यावर अभ्यास करणार आहे. थर्मोग्राफीद्वारे हे तज्ञ मूर्ती, भिंतीवरील गळती, भेगा, आणि अन्य धोके शोधतील. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुख्य मंदिरांसह देवस्थान समितीच्या ताब्यातील २८ मंदिरांना पूर्वीचे रूप देण्यासाठी ही टीम सज्ज झाली आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

थर्मोग्राफीद्वारे मंदिरातील मूर्ती, भिंती, प्रवेशद्वार, स्तंभ यांची स्कॅनिंग केली जाणार आहे. यातील भेगा गळती तपासल्या जातील. पुढील महिनाभर हे काम चालणार आहे. त्यानंतर आवश्यक दुरुस्थी कामांचा डीपीआर तयार करून तो देवस्थान समितीकडे सुपूर्द केला जाईल. त्याची पुढची प्रक्रिया ही मंदिर समितीची जबाबदारी आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

थर्मोग्राफी म्हणजे काय 
ज्या प्रमाने एकाद्या रुग्णाचा एक्स रे काढल्यानंतर त्यांच्या शरीरात काय व्याधी आहेत. किंवा अपघातात एकाद्या रुग्णाला आंतरिक शरीरात काही इजा झाली याचे निदान केले जाते. त्याचप्रमाणे पाषाण, मुर्तीच्या आंतरिक बाजूचा अभ्यास करण्यासाठी थर्मोग्राफी हे तंत्रज्ञान वापरले जाते. हे स्क्रिनिंग मशीन आहे. ज्याद्वारे पूर्णपणे मूर्ती, ऐतिहासिक स्थळातील होणारे बदल अभ्यासले जातात. प्रामुख्याने कोणत्या मंदिरातील देवाची मूर्ती ही कालांतराने बदलत जाते.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

अर्थात दूध, पाणी, दही, तूप, मध यानें मूर्तीला वर्षानुवर्षे अंघोळ घातली जाते. त्यात मूर्ती किंवा कोणताही दगड हा पाणी शोषून घेत असल्याने मूर्तीच्या आंतरिक केमिकल कंझर्वेशन होत जाते. अनेक बदल होत गेल्याने मूर्ती, ऐतिहासिक मंदिर याचे मूळ रूप राहत नाही.त्यासाठी थर्मोग्राफी तंत्रज्ञान वापरून पंढरपुरातील मुख्य मंदिरांसह समितीच्या अंतर्गत येणाऱ्या २८ मंदिरांचा कायापालट होणार आहे. त्यांच्या मूलरूपात मंदिर कसे असतील या साठी हे उपयुक्त ठरणार आहे. असे वास्तूविशारद प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने आम्ही राज्यभरातील मंदिराचे सर्वेक्षण करतो. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही पार पडतो. मंदिर आणि मूर्तीत होणारा बदल आणि आंतरिक बाजू समजून घेण्यासाठी आम्ही थर्मोग्राफी तंत्राचा वापर करतो. श्री विठ्ठल रुखमाई मंदिराचे आम्ही लवकरच स्क्रिनिंग करणार आहोत. त्यानंतर मंदिर समितीकडे अहवाल देणार आहोत. मंदिराचे मूळ रूप ठिकून राहिले पाहिजे यासाठी आमची टीम काम करेल. 

श्री. प्रदीप देशपांडे,  प्रसिद्ध वास्तूविशारद, राज्य पूरातत्व विभाग.