
बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना एकाच जागी तब्बल दोन तास सात मिनिटे मारहाण करण्यात आली. आरोपींनी मारहाणीचे १५ व्हिडिओ तयार केले. दोषारोपपत्रासोबत जोडलेल्या या डिजिटल पुराव्यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) फॉरेन्सिक लॅबकडून खातरजमा केली. पोलिस कोठडीदरम्यान सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी हत्येची कबुलीही दिली.