Solapur Youth Dies In Goa: मद्यधुंद मित्राला रात्रभर कारमध्ये कोंडले अन् सकाळी... सोलापूरच्या पर्यटकाबरोबर भयंकर कृत्य

Tourist From Solapur Dies In Goa: दरम्यान सोनी शिंदेला सोडून हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी सिद्धेश्वर माद्रे याने कारच्या सर्व खिडक्या बंद करत कार लॉक केली आणि ते तिघे खोलीत जाऊन झोपले.
Tourist from Solapur dies in car in Goa
Tourist from Solapur dies in car in GoaEsakal

देशभरातील लाखो पर्यटकांसाठी गोवा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुले गोवा सतत पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. असे असले तरी निष्काळजीपणामुळे अनेक पर्यटक आपला जीव गमावता अशाही बातम्या आपल्याला सातत्याने दिसत असतात.

आता असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये गोव्याला फिरायला गेलेल्या सोलापूरच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या पर्यटकाचा मृतदेह त्याच्या कारमध्ये आढळला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूरचा हा 28 वर्षीय पर्यटक मद्यधुंद अवस्थेत कळंगुट येथे रात्रभर कारमध्ये झोपला होता, तो दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील सोनी शिंदे, सिद्धेश्वर माद्रे आणि अक्कलकोटमधील वैद्यकीय आस्थापनेत काम करणारे इतर दोन मित्र १२ एप्रिल रोजी कर्नाटक नोंदणीकृत कारमधून गोव्यात आले होते. हे चौघेही कळंगुट फुटबॉल मैदानाजवळील हॉटेलमध्ये राहायला गेले.

13 एप्रिल रोजी रात्री ते बाहेर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांनी मद्यपान केले होते. सोनी शिंदे मद्यपानामुळे नियंत्रणाबाहेर गेला होता. त्याने आपल्या मित्रांना विनंती केली की त्याला हॉटेल रुमवर घेऊन चला. पण त्याच्या मित्रांनी त्याला हॉटेलमध्ये नेले नाही. त्यामुळे तो मद्यधुंद अवस्थेत रात्रभर कारमध्ये झोपला.

दरम्यान सोनी शिंदेला सोडून हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी सिद्धेश्वर माद्रे याने कारच्या सर्व खिडक्या बंद करत कार लॉक केली आणि ते तिघे खोलीत जाऊन झोपले.

Tourist from Solapur dies in car in Goa
आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी लायकी काय? अपघाताने फक्त...; चंद्रशेखर बावनकुळे यांची कडवट टीका

14 एप्रिल रोजी दुपारी ते उठून कारकडे गेले, तेव्हा सोनी शिंदे कारमध्ये तसाच पडलेला दिसला तो कोणतीही हालचाल करत नसल्याचे पाहता हे मित्र घाबरले. त्यांनी त्याला तात्काळ कँडोलीम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, पण पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले.

Tourist from Solapur dies in car in Goa
Uddhav Thackeray: 'जय भवानी' शब्द गीतामधून काढणार नाही ; उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली

बंद कारमध्ये झोपल्यानंतर उष्माघाताने शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.

मृताच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंगुट पोलिसांनी शुक्रवारी सिद्धेश्वर माद्रेविरुद्ध कलम 304A अन्वये गुन्हा दाखल केला.

कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परेश सिनारी पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com