राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना जीवे मारण्याची धमकी

चाकणकर यांना गेल्या काही दिवसात देण्यात आलेली ही तिसरी धमकी आहे.
Rupali_Chakankar
Rupali_Chakankar

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली असून, चाकणकर यांना गेल्या काही दिवसात देण्यात आलेली ही तिसरी धमकी आहे. दरम्यान, अज्ञाताकडून देण्यात आलेल्या या धमकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. (Rupali Chakankar Life Threaten News)

Rupali_Chakankar
मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना ईडीकडून अटक

राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना अज्ञाताकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीही रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले आहेत. दरम्यान, चाकणकर यांना धमकी देणारी व्यक्ती कोण आहे तसेच कोणत्या कारणातून अशा प्रकरची धमकी देण्यात येत आहे याची कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Rupali_Chakankar
जागतिक महिला दिन विशेष रुपाली चाकणकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा; पाहा व्हिडिओ

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. या पदावर असताना राज्यातील महिलांच्या प्रश्नावर केलेल्या आक्रमक शैलीतील आंदोलनांमुळे त्या कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिल्या. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी चाकणकर यांची वर्णी लागली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com