“आजी, माजी..'' नंतर आता सुभाष देसाईंच्या 'त्या' विधानाची चर्चा

subhash desai
subhash desaiesakal

मुंबई : “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा (shivsena-bjp) पुन्हा एकत्र येणार का? मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने राजकीय वर्तुळात सुरू चर्चा झाली. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhas Desai) यांनी सुचक विधानामुळें अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

“आजी, माजी..नंतर आता सुभाष देसाईंच्या विधानाची चर्चा

देसाई म्हणाले, रावसाहेब दानवे आणि मी या आठवड्यांत दोनदा भेटलो, आम्ही असेच जास्त भेटत राहिलो तर महाराष्ट्राचा विकास निश्चित आहे असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर यावर भाजपचे नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील सुभाष देसाई यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.

subhash desai
साकीनाका बलात्कार प्रकरणी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दानवेंचा देसाईंच्या विधानाला दुजोरा

"मी सुभाष देसाईंच्या मताशी सहमत आहे", आम्ही असेच रोज भेटत राहिलो तर राज्याचा विकास निश्चित आहे असे वक्तव्य दानवेंनी केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते सुभाष देसाईंच्या विधानाला दुजोरा दिला आहे.

राजकीय दिशा समजून घ्या - दानवे

सत्तेसाठी त्यांची तडजोड, अमर अकबर अॅनेथनी - तीन तोंड तीन दिशेला, त्यांची समस्या म्हणून एकत्र आले असे देखील महाविकास आघाडीवर बोलताना सांगितले. ते तिघे काय एकमेकावर टीका कशा बोलतात आणि आम्ही (देसाई - दानवे )कोणती भाषा वापरतो यावरून राजकीय दिशा समजून घ्या असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

...तर लोकल सर्वांना सुरू करण्यात अडचण नाही.

दरम्यान राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणला असे पत्र पाठवले तर केंद्र सरकारची लोकल सुरू करण्यात अडचण नाही. असेही दानवे यांनी सांगितले

subhash desai
"त्या हॉटेलमध्ये गिते पडले होते पवारांच्या पाया"

काय म्हणाले होते मुख्यमंत्री...?

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमीत्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणाची सुरुवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले. त्यांनतर मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, "मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी', असं म्हणत युतीचे दरवाजे खुले असल्याचे एकप्रकारे संकेतच दिले. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

'माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल', असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केलं होतं. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केल्यानंतर त्यांनी हे भाष्य केलं होतं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com