esakal | उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणार; हवामान खात्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

Summer forecast for April to June  Announced by the Indian Meteorological Department

भारतीय हवामान खाते गेल्या चार वर्षांपासून पावसाबरोबरच उन्हाळा आणि हिवाळ्याचाही अंदाज वर्तवित आहे. माँन्सून मिशन कपल्ड फोर्कास्टिंग सिस्टिम या आधारावर देशातील 36 हवामान उपविभागातील उन्हाळ्याच्या एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा अंदाज सोमवारी जाहिर केला. त्यात हे नमूद केले आहे. 

उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणार; हवामान खात्याचा अंदाज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या चटक्यात होरपळून निघेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सोमवारी दिला. मध्य महाराष्ट्र आणि मरठवाड्यात उष्णतेच्या लाटा येतील, असा इशाराही यात देण्यात आला आहे. 


बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय हवामान खाते गेल्या चार वर्षांपासून पावसाबरोबरच उन्हाळा आणि हिवाळ्याचाही अंदाज वर्तवित आहे. माँन्सून मिशन कपल्ड फोर्कास्टिंग सिस्टिम या आधारावर देशातील 36 हवामान उपविभागातील उन्हाळ्याच्या एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा अंदाज सोमवारी जाहिर केला. त्यात हे नमूद केले आहे. 

Coronavirus : एका दिवसात महाराष्ट्रातील आकडा १२ने वाढला; कोणत्या ठिकाणी किती वाढले रुग्ण

एप्रिल ते जून या तिनही महिन्यांमध्ये देशातील बहुतांश भागात दिर्घकालीन सरासरीच्या तुलनेत कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढलेला असेल, असा निष्कर्ष माँन्सून मिशनच्या माहितीच्या विश्लेषणावरून हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे. 

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

दिवसा चटका
मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण-गोवा, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, रायलसिमा, केरळ, पूर्व आणि पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या हवामान उपविभागात उन्हाचा चटका वाढणार आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या ते एक अंश सेल्सिअसने वाढेल


Coronavirus : आपण कोरोनावर विजय मिळवणारच; पण...: शरद पवार

रात्रीचा उकाडा
पूर्व राजस्थान आणि गुजरात या भागात रात्रीच्या तापमान सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त नोंदले जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, विदर्भ, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी यासह उत्तर भारतातील बहुतां हवामान उपविभागात किमान तापमानाचा पारा अर्धा ते एक अंश सेल्सिअसने वाढेल, असेही या हवामान अंदाजात म्हटले आहे. 

'...तर आसाराम बापूंची प्रथम सुटका करा

'
उष्णतेच्या लाटेचा इशारा
महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ असे हवामान उपविभाग आहेत. यापैती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट निर्माण होते. यंदाही या उष्णतेच्या लाटा निर्माण होती. एप्रिल ते जून या दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा रहाण्याची शक्यता 40 टक्के असल्याचेही खात्याने या अंदाजात स्पष्ट केले आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा तेलंगणा या राज्यांमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट परसते. 

एलनिनोत बदल नाही
विषुवृत्ताच्या प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एलनिनोमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तो स्थिर आहे. पुढील तीन महिने या स्थितीत कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.