Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा संताप अन् अमोल मिटकरींना मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा संताप अन् अमोल मिटकरींना मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?

मुंबईः अजित पवारांमुळेच सुप्रिया सुळे निवडून येतात, असं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला होता. अमोल मिटकरी यांना या प्रकरणात माफी मागावी लागली.

अमोल मिटकरी म्हणाले होते की, सुप्रिया सुळेंनी भाषणात अजितदादांसारखा भाऊ पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं.. मी त्यांचं शंभर टक्के समर्थन करतो. त्यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांसारखा भाऊ तन-मन-धनाने काम करतो. म्हणून त्या निवडून येतात.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा संताप अन् अमोल मिटकरींना मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?
भुजबळांवरील आरोपांच्या चौकशीचे काय? अंजली दमानिया यांनी घेतली न्यायालयात धाव

अमोल मिटकरी यांच्या या विधानानंतर सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला होता. ''आम्ही नेहमीच तन आणि मनाने लढाई लढली. परंतु कधीही धनाचं राजकारण केलं नाही. अमोल मिटकरी यांचा याबाबत गैरसमज झाला असेल की, आम्ही धनाने निवडणुका जिंकतो.'' अजित पवार आणि मी कधीही पैशांनी निवडणुका जिंकल्या नाहीत, असं सुळेंनी म्हटल्यानंतर अमोल मिटकरींनी माफी मागितली आहे.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा संताप अन् अमोल मिटकरींना मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?
Hasan Mushrif : 'मुश्रीफांनी कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे दुसऱ्याच कंपन्यांत गुंतवले', कोर्टाची टिपण्णी

मिटकरी म्हणाले की, धन या शब्दामुळे सुप्रियाताईंना वाईट वाटलं असेल. परंतु आपण सहज बोलताना तन-मन-धन असा शब्दप्रयोग करतो. तसंच मी बोललो आहे. त्यांचा गैरसमज झाला आहे.. एक भाऊ म्हणून मी सुप्रिया सुळेंची माफी मागतो, असं मिटकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com