Chitra Wagh Vs Sushma Andhare: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौऱ्यात वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी दोन वेळा मुंबईत येऊन गेले. आता अमित शाह पुणे आणि नागपूर दौऱ्यावर येत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतल्यामुळे मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळे कंठ घोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरा करण्यापेक्षा मुंबईत 2 BHKचा फ्लॅट घ्यावा आणि इथं राहावं, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.
सुषमा अंधारे यांच्या टीकेमुळे भाजप नेते संतापले आहेत. अंधारे यांच्या टीकेवर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार केला आहे. "सुषमा अंधारे ताई, मला वाटत आपलं ज्ञान कमी आहे.
थोडा अभ्यास केलात तर बरं होईल! महापालिका व सरकार लुटून फ्लॅट, प्रॉपर्टी, इस्टेट बनवण्याचे धंदे तुमचे नेते व युवराजांचेच आहेत. उगाच मुंबईत मातोश्री-२ उभा राहिलेले नाही, असा पलटवार भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
भाजप महिला अध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, विनाशकाले विपरीत बुद्धी... सुषमा अंधारे गरळ ओकायची म्हणजे किती त्याला काही मर्यादा? आम्ही घरात बसून राहणारे नाही.
आम्हाला जनतेत राहायला आवडतं, जनतेसोबत संवाद हाच आमचा परमोच्च आनंद! पण ज्यांचं सरकार कधी घराबाहेर पडलच नाही, त्यांची हे समजायची कुवतच नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.